आपला जिल्हा

गवळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करणार – अविनाश कांबळे

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – गवळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण सदैव प्रयत्न करणार असून गवळी समाज बांधव आणि माझे मित्र मंडळ यांनी माझ्या विजयात जो सिंहांचा वाटा उचलला आहे . या बद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. या पुढे आपला हक्काचा माणूस म्हणून मला हाक मारा मी आपल्या सेवेत हजर असेन असे प्रतिपादन अविनाश कांबळे यांनी केले.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पंच वार्षिक निवडणुकी मध्ये बहुमतांनी विजयी झालेले संगमेश्वर शाखेचे विश्वस्त अविनाश कांबळे यांचा संगमेश्वर शाखेतर्फे मुलुंड मुंबई येथे हॉटेल सन्मान येथे शुक्रवारी विजयोत्सव व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित विश्वस्त अविनाश कांबळे बोलत होते.सदर कार्यक्रमास उद्योजक शंकरशेठ माटे, डॅशिंग नेतृत्व उद्योजक चंद्रकांत भोजने, उद्योजक तुषार खेतल , समाजसेवक गंगाराम टोपरे ,यशवंत टोपरे, यशवंत कांबळे , महादेव दाते, जुगनू कांबळे, संदीप टोपरे, विक्रांत भोजने, संदीप भोजने, संदीप चाचे, संदीप भालेकर,अतुल बांडागळे,रुपेश थोरावशे, अंकुश चिले, सुनील माटे, जयेंद्र भालेकर, दिनेश बिरवटकर, व सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Back to top button